पंढरपूर - छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६३ व्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक ३ जून रोजी माऊली क्लासेस,पंढरपूर येथे वासुदेव बडवे व आनंद नगरकर यांनी तुळस,आंबा,चिंच,चिकू,पेरु, रामफळ, सिताफळ, रिठा इत्यादी प्रकारची ३६३ रोपे व ३६३ सीडबॉलची पाकीटे तयार केली. गुरूवार दि.४ जून रोजी ‘हिंदू साम्राज्य दिन’ निमित्ताने पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या व छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन पंढरपूर नगर परिषद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांचे हस्ते करण्यात आले. 


  तेथेच सर्व महिला व पुरूष पर्यावरणप्रेमींना ३६३ रोपांचे व एकूण ५००० सीडबॉल (बीजगोळे) चे वाटप मुख्याधिकारी यांचे हस्ते करण्यात आले.


 त्यावेळी नगरपालिकेचे संतोष कसबे उपस्थित होते. सर्वांनी या उपक्रमाबद्दल आनंद नगरकर व राजेश बडवे यांना मनापासून धन्यवाद दिले. 

यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर म्हणाले, बीजगोळे व रोपे वाटप हे सध्या कोरोना काळात पर्यावरणाचा समतोल राखणेसाठी अत्यंत आवश्यक आहे व लॉकडाऊनच्या काळात रोपे व बीजगोळे बनवले हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.

     यावेळी आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी,डॉ. सचिन लादे, तुकाराम खंदाडे, सौरभ थिटे, शिवप्रतिष्ठानचे विभाग प्रमुख भैय्या खडके, प्रज्वल खडके आदी उपस्थित होते. सदर उपक्रम कोरोना कालावधीतील सर्व नियम व अटींचे पालन करून साजरा करण्यात आला. 

  यासाठी प्रमोद कुलकर्णी, पंढरपूर हिंदूमहासभा अध्यक्ष बाळासाहेब डिंगरे, रामकृष्ण महाराज जाधव, ओंकार कापसे, तसेच शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे धारकरी आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
 
Top