पंढरपूर- निरा उजवा कालवा माळशिरस शाखा क्र.२ वर कार्यरत असणाऱ्या १७ पाणी वापर शिखर संस्थेचे अध्यक्ष तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या प्रयत्नांना यश आले असून,निरा उजव्या कालव्यामधून उन्हाळी हंगामातील पाण्याचे दुसरे आवर्तन सोडण्यात आलेले आहे.


  माळशिरस भाळवणी शाखा क्र.२ वरील १७ पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात कल्याणराव काळे यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत निरा उजव्या कालव्या मधून पाण्याचे दुसरे आवर्तन तातडीने सोडण्याची गरज व्यक्त केली होती. उन्हाळयाची तीव्रता आणि शेतीसाठी अत्यावश्यक पाण्याची गरज ओळखून कल्याणराव काळे यांनी फलटण विभागांतर्गत येणाऱ्या निरा उजव्या कालव्यावरील माळशिरस भाळवणी शाखा.क्र.२ साठी उन्हाळी हंगाम २०१९ -२०२० मधील पाण्याचे दुसरे आवर्तन त्वरीत सोडण्याची मागणी कार्यकारी अभियंता श्री.बोडके यांचेकडे केली होती. त्यानूसार कल्याणराव काळे यांच्या मागणीची तातडीने दखल घेवून,मंगळवार दि.९ जुनपासून भाळवणी शाखा क्र.२ वरील पाणी वापर संस्थांसाठी निरा उजवा कालव्यातून पाण्याचे दुसरे आवर्तन सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे भाळवणी शाखा क्र.२ वरील ११ गावातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतीपाण्याचा प्रश्न सुटला आहे. 

   दरम्यान,पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याणराव काळे यांच्यासह कार्यकारी अभियंता श्री.बोडके,उपकार्यकारी अभियंता श्री.ठावरे व संबंधितांचे आभार मानले असून,योग्यवेळी शेतीला पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 
 
Top