पुणे दि.२७ /०६/२०२० - पुणे येथे काही दिवसांपासून आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. कोरोनामुळे सर्व बाजारपेठ बंद, नौकऱ्या जाण्याचे प्रमाणात वाढ, कौटुंबिक जबाबदारी सांभाळतांना निर्माण होणाऱ्या समस्यांना कंटाळून आत्महत्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. सर्व्हेनुसार गेल्या दोन महिन्यात ५० च्या आसपास नागरिकांनी समस्यांना सामोरे न जाता आपले जीवन संपविले आहे. शिवसेना प्रवक्त्या, स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी या आत्महत्या रोखण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. 


   यात ज्या लोकांना समस्या कोणत्याही प्रकारच्या असतील त्यासाठी पुणे पोलिस नियंत्रण कक्षाच्या १०० नंबरवर उपलब्ध असणारे व पोलिस ठाण्याचे गस्तीवर असणारे बीट मार्शल पोलिस कर्मचारी हे सर्वसामान्य नागरिक किंवा पीडित व्यक्तिच्या पहिल्यांदा संपर्क साधण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना समुपदेशनाचे धडे शिकविले जाणार आहेत. त्याचा उपयोग नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी केला जाणार आहे.

    तसेच या घटना सतत घडत असल्याने नवीन हेल्पलाईन नंबर, सर्वेक्षण, संवाद, समुपदेशन, तत्काळ प्रतिसाद यांच्यावर भर देण्याची इच्छा आ.डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केली. 

   स्त्री आधार केंद्र संस्थेचे संजय सिरसाट यांना 9158523881 दूरध्वनीवर अथवा streeaadharkendra@gmail.com या इमेलवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
 
   प्रत्येकांनी आपल्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तींच्या स्वभावात काही बदल झाला आहे का? त्यांना काही समस्या असेल तर त्या सोडवण्यासाठी पोलिसांची किंवा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मदत करण्याचे आवाहन आ.डॉ.गोऱ्हे यांनी केले आहे.

    आपल्या ज्या नातेवाईकांशी बऱ्याच दिवसां पासून संपर्क झाला नाही अशा नातेवाईकांना फोन वरून संपर्क करून त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रयत्न करावा यामुळे संवाद वाढल्याने आत्महत्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल असा विश्वास आ.डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केला. 

    सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी सामाजिक बांधिलकी ओळखून आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन देखील या निमित्ताने आ.डॉ.गोऱ्हे यांनी केले आहे.

     आतापर्यंत संस्थेच्यावतीने आणि आ.डॉ.गोऱ्हे यांच्या सहकार्याने आतापर्यंत गरजू अनेकांना धान्याची व्यवस्था तसेच दवाखान्यातील मदत, दुसऱ्या राज्यात तसेच देशात अडकलेल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली आहे.आता आर्थिक,काम नसल्याने,कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा या नैराश्यातून आत्महत्याचा विचार डोक्यात येणाऱ्या नागरिकांचे समुपदेशन आणि त्यांचे समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असून कितीही समस्या आल्या,नैराश्य आले तरीदेखील आत्महत्याचा विचार डोक्यात येता काम नाही. आत्महत्या हा काही त्यावर पर्याय नाही, या समस्या सोडवण्यासाठी फक्त सरकारनेच नव्हे तर सामान्य जनतेनंही सहकार्य करणं आवश्यक असल्याचं मत आ.डॉ.गोऱ्हे यांनी मांडलं आहे.
 
Top