सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी प्रदेश कॉंग्रेसने केले शेतकऱ्यांना मोफत मका बियाणे वाटप

पंढरपूर- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे वाटप करून वाढदिवस साजरा केला.


     राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे म्हणाले की,आमदार भारत भालके यांनी सूचना केली की सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे संकट उभे असताना खासदार सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने डिजिटल बोर्ड, विविध कार्यक्रम न करता शेतकऱ्यांना आधार देण्याच्या हेतूने पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मकेचे बियाणे द्यावेत. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे ही भावना मनात ठेवून हा उपक्रम घेतला आहे, असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

       यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनीही साहेबांची प्रेरणा व आमदार भारत भालके यांचे मोलाचे मार्गदर्शन यासाठी मिळत असल्याचे सांगितले.

        जिल्हा सचिव सुरज पेंडाल,उपाध्यक्ष दादा थिटे, उपाध्यक्ष विजय मोरे,मल्हार आर्मीचे संतोष बंडगर,सुरज कांबळे, नवनाथ आसबे व शेतकरी उपस्थित होते. 
 
Top