पंढरपूर -सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, अशा परिस्थितीत आषाढी एकादशीचा सोहळा भरल्यास राज्यभरातील वारकरी पंढरपुरात एकत्र येतील. यामुळे कोरोनाचा अधिक प्रसार होईल. त्यामुळे श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशी सोहळ्या निमित्त पंढरपूरात भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी ३० जून दुपारी २ ते २ जुलैपर्यंत संचार बंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. या यासंदर्भात सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार असल्याची माहिती अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.

पंढरपूरातील नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांनी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्याकडे संचारबंदीचा कालावधी कमी करण्याबाबत मागणी केली होती.नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी संचारबंदी कालावधी अडीच दिवसाचा करावा असे निवेदन देण्यात आले .

  यावेळी पंढरपूरच्या नगराध्यक्षा सौ.साधना भोसले,आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, नगरसेवक गुरुदास अभ्यंकर, कृष्णा वाघमारे, विक्रम शिरसट,संजय निंबाळकर,महादेव भालेराव,माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट,हरीश ताटे, संदीप मांडवे,अरुण कोळी,गणेश अंकुशराव, लखन माने ,अमोल डोके उपस्थित होते.

सोमवार २९ जुन रोजी सर्व दुकाने दुपारी ५ वाजे  पर्यंत व मंगळवार ३० जुन रोजी दुपारी २ वाजेपर्यत चालु राहतील त्यानंतर संचारबंदीला सुरवात होईल.बुधवार १ जुलै पूर्ण संचारबंदी तर गुरुवार २ तारखेला दुपारपर्यंत  परिस्थितीनुसार संचारबंदी कधी समाप्त होईल संदर्भात माहीती दिली जाईल.उद्या सोमवार २९/६/२०२० सर्व दुकाने ५ वा पर्यंत चालु राहतील.
 
Top