आंजर्ले ,ता.रत्नागिरी येथील चक्रीवादळग्रस्त नागरिकांना मदत करणेबाबत आ.डॉ.नीलम गोऱ्हे माजी उप सभापती, महाराष्ट्र विधान परिषद तथा उपनेता,शिवसेना यांच्या स्थानिक प्रशासनास सूचना.
मुंबई दि.०६/०६/२०२०/-निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी, पालघर आदी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांचे, पिकांचे, झाडांचे नुकसान झाले आहे. मुंबई येथे राहणाऱ्या महेश मयेकर यांचे आंजर्ले ता.दापोली, जि.रत्नागिरी या गावात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत मदत कार्य करण्यासाठी त्यांनी आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांचे सोबत संपर्क साधला. डॉ.गोऱ्हे यांनी तात्काळ प्रांताधिकारी, दापोली यांना सूचित केले व सविस्तर माहिती घेतली.

   आंजर्ले ता.दापोली येथील चक्रीवादळामुळे बंद झालेला रस्ता सुरु झाला असून गावात कम्युनिटी किचन सुरु करण्यात आले आहे तसेच रेशनधान्य वाटप करण्यात येत आहे.नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे ग्रामसेवक व तलाठी यांचेमार्फत करण्यात येत असून शेतीचे व फळबागांचे नुकसानीचे  सर्वेक्षण कृषी सहाय्यकांमार्फत करण्यात येत आहे गावचा वीजपुरवठा व दूरध्वनी सेवा पूर्ववत करण्याचे  प्रयत्न करण्यात येत असून लवकरच ती सुरळीत होईल असा विश्वास प्रांताधिकारी श्री. पवार यांनी व्यक्त केला . मदत कार्यात सर्वांनी जोमात काम करावे व बाधितांच्या पुनर्वसनासाठी  प्रयत्न करावे असे आवाहन ना डॉ.गोऱ्हे यांनी केले.
 
Top