जे मैफीलीत आले ते
स्वतःला विसरून गेले !!

ज्यांनी पेल्यावर पेले रिते केले
ते पशूतूल्य वागू लागले!!

पिताना ते सर्वाना लाजवू लागले 
हरपून शुद्ध डरकाळ्या फोडू लागले !!

घरी जाताच घर अनोळखी झाले 
रात्र बाहेरच काढून ऊपरे झाले !!

सकाळ होताच लाजुनी घरी आले 
कुटुंबास पहाताच नशा मुक्त झाले !!

 

     भारताने चीनला डोक्यावर घेतलं 
चीनने मात्र वेळ येताच 
     केसांन गळा कापायच जुनच तंत्र वापरलं 
मैत्रीच सपान तव्यावरच करापल 
     उड्या मारनारांच भान जाग्यावरच हरापल "

आनंद कोठडीया,जेऊर ९४०४६९२२००


 
Top