३३/११ के व्ही उपकेंद्राला स्वतंत्र लाईन टाकून मिळावी यासाठी पटवर्धन कुरोली ग्रामस्थ व स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार उपोषण

शेळवे (संभाजी वाघुले)- पटवर्धन कुरोली ता. पंढरपूर येथील ३३/११ के व्ही उपकेंद्राला स्वतंत्र लाईन टाकून मिळावी म्हणून पटवर्धन कुरोली, आवे, तरडगाव ,नांदोरे, शेवते, खेड भोसे, देवडे या गावातील ग्रामस्थांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी पटवर्धन कुरोली येथील ३३/११ केवी उपकेंद्राला स्वतंत्र लाईन टाकून मिळावी म्हणून एक आमरण उपोषणाचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे दिले आहे.

पटवर्धन कुरोली ३३/११ के व्ही उपकेंद्राला करकंब येथून २२० केव्ही साधारण पंचवीस किमी वरून ३३/ ११ केवी लाईन येत असून मध्येच शेवते ३३ /११ के व्ही .नांदुरे ३३/ ११ के व्ही व पटवर्धन कुरोली असे एकूण तीन उपकेंद्र एकाच लाईन वरती आहेत त्यामुळे पट कुरोली उपकेंद्राला मिळणारे होल्टेज अतिशय कमी दाबाने व वारंवार वीज खंडित होत असल्याने पटवर्धन कुरोली येथील उपकेंद्रा वरती जे वीज ग्राहक शेतकरी आहेत त्यांना नेहमीच अतिशय कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने शेती पिकांना वेळेवर सिंचन करता येत नाही रोहित्र व शेती पंप वारंवार जळतात त्यामुळे वरील गावातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे भीमा नदी व बोर विहिरींना पाणी असून सुद्धा प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांची उभी पिके फळबागा व जनावरांचा चारा वाळून जात आहे.

शेतातील उभी पिके जळालेली शेतकरी कर्जबाजारी झाला आहे म्हणून पटवर्धन कुरोली ३३/११ के व्ही उपकेंद्राला स्वतंत्र अशी नवीन लाईन टाकून मिळावी अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुख्य मागणी आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्यकारणी सदस्य कांतीलाल नाईकनवरे यांनी सांगितले.

कांतीलाल नांईकनवरे म्हणाले की आपण सदर मागणी गेली आठ ते दहा वर्षे झाले येथील लोकप्रतिनिधी सह वीजवितरणचे अधिकारी, अभियंता यांच्याकडे करतो आहोत परंतु आमच्या या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली व ते पुढे म्हणाले की भाळवणीच्या २२० के व्ही उपकेंद्रतुन कमी अंतरवरून किंवा करकंब येथून पटवर्धन कुरोली उपकेंद्राला स्वतंत्र अशी ३३/११ के व्ही नवीन लाईन टाकुन मिळावी म्हणून गेली आठ ते दहा वर्षे झाली आम्ही वरील पाच सहा गावांकरीता वारंवार महावितरण व प्रशासना कडे मागणी करीत आहोत परंतु लोकप्रतिनिधी या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे .त्याबद्दल उर्जा मंत्र्यांना दिलेल्या स्मरणपत्राचे लेखी स्वरुपात उत्तर मिळाले नाही तर आम्ही स्वाभिमानी संघटना व ग्रामस्थ ३० जुन नंतर प्रशासनाच्या परवानगीने आमरण उपोषण करणार असल्याचेही त्यांनी या सांगितले आहे.
 
Top