पंढरपूर ,(प्रतिनिधी)- भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे .

या पार्श्वभूमीवर शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी भारतीयांना चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आव्हान केले आहे.चीनच्या गोळीबाराला भारतीय सैन्य योग्य वेळी त्या ठिकाणी उत्तर देईल.मात्र भारतीयांनी चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकून भारतीय सैन्याच्या पाठीशी उभं राहावं यापुढे भारतात चीनच्या वस्तू आयात होऊ देवू नये.भारत देशातील सर्व भारतीय बांधव देशातील जवानांबरोबर आहोत आणि चीनच्या सर्व वस्तूवर बहिष्कार टाकून चीनचा जाहीर निषेध करावा असे आव्हान शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी केले आहे.
 
Top