पंढरपूर - सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रशासन,सामाजिक संघटना, राजकीय संघटना, स्वयंसेवक प्रयत्नशील आहेत.


  शहरामध्ये बाहेरगावाहून अनेक लोक येत आहेत त्यामध्ये विशेषतः पुणे ,मुंबई,सांगली,सातारा या रेड झोनमधून लोक येत आहेत अशा लोकांना संस्थात्मक विलगीकरण व काही लोकांना घरी विलगीकरण करण्यात आलेली आहे.अशा परिस्थितीमध्ये पंढरपूर शहरातील निमा डॉक्टर संघटनेचे ५० ते ६० डॉक्टरांनी शहरातील या नागरिकांची गेल्या दीड महिन्यापासून दररोज त्यांच्या घरी जाऊन तपासणी करत आहेत तसेच या नागरिकांना कोणत्याही प्रकारची कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत किंवा नाही याची दररोज तपासणी करण्यात येत आहे .या कोरोनाच्या साथी चा प्रादुर्भाव रोखण्याच्यादृष्टीने प्रशासनाने  केलेल्या तपासणीमुळे पंढरपूर पॅटर्न हा यशस्वी होत असून पंढरपूर शहर हे कोरोना मुक्त राहिले . 

    या डॉक्टरांनी केलेल्या कामाचा गौरव करण्या साठी व ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी आमदार प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,पक्षनेते गुरुदास अभ्यंकर,उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव ,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,नगरसेवक अक्षय गंगेकर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट,आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, उपमुख्यअधिकारी सुनील वाळुजकर, नगरसेवक विक्रम शिरसट,नवनाथ रानगट,नरेंद्र डांगे,निमा डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ.दत्तात्रय व्हनमाने , उपाध्यक्ष डॉ.अमरसिंह जमदाडे , डॉ. मिलिंद जोशी,डॉ.चंद्रकांत लवटे,डॉ.किशोर बागडे, डॉ.पराग कुलकर्णी, डॉ.प्रताप माने,डॉ अमोल बनसोडे व शहरातील सर्व निमा डॉक्टर यांच्या समवेत बैठक संपन्न झाली.

 या बैठकीमध्ये आमदार प्रशांत परिचारक यांनी सर्व डॉक्टर यांनी केलेले काम अतिशय चांगले असून त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला.

 नगराध्यक्ष सौ साधनाताई नागेश भोसले यांनी सर्व डॉक्टरांनी नगरपरिषदेच्या आव्हानाला प्रतिसाद देत शहरातील कोरोना विषाणूला लांब ठेवण्यास मदत केली व नगरपरिषदेला सहकार्य केले त्या बद्दल सर्वांचे आभार व्यक्त करून ऋणनिर्देश केले.
 
Top