कोरोनामुळे आषाढी वारी नाही !


      शेळवे ,(संभाजी वाघुले) - आषाढी वारीच्या वाटेवरील अगदी छोटे व मोठे व्यापारी आपापल्या परिने आपला व्यवसाय करतात.माञ या वर्षीची आषाढी वारी नेहमी सारखी नसल्याने या आषाढी वारीवर आपल्या व्यावसायाचे नियोजन करतात यांना व विठ्ठल भक्तांनाही काही तरी विठ्ठलानेच चमत्कार घडवून आषाढी वारी पुर्ववत करावी अशी आशा मनोमनी वाटत आहे.


    पंढरपुरातील छोटे-मोठे व्यापारी आषाढी वारीच्या अगोदर आपापल्या व्यवसायाची संपुर्ण रुपरेखा आखून सर्व माल भरुन ठेवतात.परंतु कोविड १९ च्या प्रार्दुभावामुळे यावर्षीची वारी नेहमी सारखी लाखों भक्तांच्या सानिध्यात भरणार नाही.यामुळे पंढरपुरातील अगदी घरमालक , ऊदबत्ती ,कुंकु ,हळद,घोंगडे व शेतीची अवजारे , पाणी बाटल्या तसेच अनेक लहान मोठे पण वर्षभराची कमाई करुन देणारी ही आषाढी वारी परंतु कोरोनामुळे या सर्व व्यावसायिकांच्या स्वप्नांवर पाणी सोडणारी आहे.

   या आषाढी वारीसोबतच अनेक चहावाले , इस्ञीवाले अगदी आळंदीपासून ते पंढरपुरातील गोपाळकाला होईपर्यंत राहुन आपल्या छोट्या व्यवसायांवर वर्षभराची कमाई करतात.

    या आषाढी वारीत बहुतांश शेतीची औजारे , पखवाज ,विना,टाळ घोंगडी, हळद कुंकु बुका, चिरमुरे ,खेळणी, फळे विक्रेते, हाॅटेल व्यावसायीक भुईमुगांच्या शेंगा विकणारे, छञी व पावसाळी कागद विकणारे, गंध लावणारे ,दुर्वा व तुळशीहार विकणारे अशा छोट्या छोट्या व्यावसायिकांना या वर्षीच्या आषाढी वारीच्या आशेवर न राहता सद्य स्थितीत शासनाच्या नियमांचे पालन करतच दुसरा व्यवसाय करुनच आपला उदरर्निवाह करावा लागणार आहे .

या कोरोनामुळे आषाढी वारीचे व विठ्ठल भक्तांचे आवडीचे प्रत्येक ठिकाणी होणारे रिंगण सोहळाही होणार नसल्याने विठ्ठल भक्तांना व आवर्जुन हे रिंगण पाहण्यासाठी शेकडो किलोमीटरवरुन येणार्या सर्वांनाच यावर्षी आषाढी पायीवारी व रिंगण सोहळा पाहायला मिळणार नाही.

  यावर्षी कोरोनामुळे आषाढीवारी होणार नसल्याने विठ्ठल भक्तांना विठ्ठलाचे व संतांच्या पालख्यांचेही दर्शन होणार नसून विठ्ठल भक्तांना आपल्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घरी बसुनच मोबाईल व टि.व्ही वरच घ्यावे लागणार आहे.

   विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन आता मोबाईलवर मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १७ मार्च पासून पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद केले आहे. त्यातच यंदाचा आषाढी पालखी सोहळा आणि १ जुलै रोजी पंढरपूरात भरणारी आषाढी यात्रा रद्द केली आहे. त्यामुळे वारकर्यांचा यंदाच्या आषाढी यात्रेचा लाभ चुकणार आहे.असे असले तरी विठुभक्ताना आता घर बसल्या विठ्ठल रुक्मिणीचे मोबाईलवर लाईव्ह दर्शन घेता येणार आहे.यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन हे स्वतंत्र अँप तयार केले आहे.या अँपच्या माध्यमा तून लाखो भाविकांना घर बसल्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेता येणार आहे.हे अँप प्ले स्टोअरवरून उपलब्ध केले आहे .
 
Top