आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस साजरा करावा - नगराध्यक्षा साधनाताई भोसले
 पंढरपूर:- पावसाळा आला की नागरी हिवताप विभागाची व आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज होते. या वर्षी न.प.पंढरपूरच्या आरोग्य विभागा कडून नैसर्गिक उपाय योजनांबरोबर अँटी बायोलॉजिकल उपाय योजना व सर्वेक्षण केले जाणार आहे. पंढरपूर पॅटर्नमध्ये या वर्षी आपण नैसर्गिक उपाययोजना व सर्वेक्षणावर भर देणार असल्याचे आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले.


नैसर्गिक उपाय योजनेमध्ये जीवशास्त्रीय उपाययोजना, कंटेनर सर्वे येतात. जीवशास्त्रीय उपाय योजनेमध्ये आपण डास प्रति बंधासाठी गप्पी मासे केंद्र उभे करतो. पंढरपूर शहरामध्ये आपण २५ ठिकाणी गप्पी माशांचे पैदास केंद्र उभे केले असुन,आपणास अजुनही केंद्र वाढवायची आहेत. प्रत्येक गल्ली मध्ये गप्पी माशाचे केंद्र व्हावे अशी माहीती सांगितली. नागरी हिवताप विभागाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्याकडे जागा असल्यास गप्पी मासे आपणास उपलब्ध करुन दिले जातील.कंटेनर सर्वे करताना विविध भागात , घरोघरी जाऊन पाण्याचे साठे तपासण्यात येतात. तेथे डास आळ्या सापडल्यास ते पाणी कोरड्या जागी ओतण्यात येते. हौद असल्यास गप्पी मासे सोडण्यात येतात किंवा अँबेट औषध सोडण्यात येते.डासाचे जीवनचक्र ८ ते१२ दिवसाचे असल्याने आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस पाळा असे सांगण्यात येते. यामध्ये घरातील फ्रिजमागील पाणी, कुलर, कुंड्या, भंगार, टायर, टाकीमधील पाणी आठवड्यातून एक दिवस कोरडे करण्यास सांगितले जाते कारण डासांनी अंडी दिल्यास त्याचे डासात रुपांतर होण्यास १० ते १२ दिवस लागतात.

        अँटीबायोलॉजिकल उपाय योजनांमध्ये केमिकलची व किटकनाशकांची फवारणी केली जाते.तसेच डासांचे प्रमाण आटोक्यात न आल्यास धुर फवारणी केली जाते.धूर फवारणीपेक्षा साठलेल्या पाण्यात किटकनाशक फवारणी करणे खुप उपयुक्त आहे. डास होण्याआधी प्रशासनाने व नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. या वर्षीपासुन आरोग्य विभागाकडून किटकशास्त्रीय सर्वेक्षण केले जाणार असून , रक्त नमुने तपासणी व पाणी नमुने वरचेवर तपासले जाणार आहेत. 
   
      आपल्या घरात लहान मुले व जेष्ठ नागरिक असु शकतात.त्यामुळे डासांच्या प्रतिबंधासाठी डासांची कॉईल, लाईटवरची डासांना पळवणारी मशीन, अगरबत्ती, क्रिम यांचा वापर कमीत कमी करावा. टाळता येत असेल तर टाळावा. यापेक्षा नैसर्गिक उपाययोजना अमलात आणाव्यात. या मध्ये मच्छरदाणीचा वापर, घरातील खिडक्यांना जाळी बसवणे,नैसर्गिक तेलाचा वापर,नीम ऑईल मध्ये कापुर मिसळुन दिवा लावणे, सुकलेल्या कडुलिंबाच्या पानांचा धुर करणे,डास प्रतिबंधा साठी जैविक अगरबत्ती वापरणे अशा प्रकारच्या उपाययोजना करणे नैसर्गिक व सुरक्षित आहे,असे आवाहन न.प.आरोग्य विभाग व नागरी हिवताप विभागाच्या वतीने सर्व पंढरपूरकरांना करण्यात येत आहे अशी माहिती आरोग्य समिती सभापती 
विवेक परदेशी यांनी दिली. 
 
Top