पंढरपूर - कोरोना (कोवीड १९) या आजाराचे प्रतिबंधक उपाययोजना अनुषंगाने जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशाने शहरातील दुकानदार व्यवसायिक यांनी मास्क व रुमाल न वापरणे तसेच फिरते विक्रेते , भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे . नागरिकांनी किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये याकरिता दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.


या अनुषंगाने नगरपरिषद पंढरपूर व पोलीस प्रशासन यांचे संयुक्त पथक स्थापन करून शहरा तील करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आज अखेर शहरातील विविध भागातील नागरिक ,व्यवसायिक , फेरीवाले असे एकूण ४३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन ८९००/- रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी आवाहन केले आहे.
 
Top