पंढरपूर,(नागेश आदापूरे ) - जून २०२० ते डिसेंबर २०२० सारखे या कालावधीमध्ये पंढरपूर शहरा तील नागरिकांना डेंग्यूताप, हिवताप व किटकजन्य रोगांचा कोणताही प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव,आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,आरोग्य अधिकारी डॉ. संग्रामसिंह गायकवाड, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एकनाथ बोधले,जीव शास्त्रज्ञ के एस मंजूळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य व्यवस्था युद्धपातळीवर राबवण्यात येत आहे. नागरिकांना किटकजन्य आजार आणि त्यावरील उपाययोजना, घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आली. काही घरांमध्ये डासांच्या आळ्या सापडल्या त्याठिकाणी टँमिफाँसचे द्रावण टाकण्यात आले. गप्पी मासे आणि डासांच्या आळ्या यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आणि कंटेनर सर्वे करण्यात आला .ज्या नागरिकांनी नगरपालिकेच्या भुयारी गटारींना घरातील सांडपाणी पाईप जोडले नाहीत त्यांना नोटीस काढण्याबाबत मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर आणि नगराध्यक्ष सौ साधना ताई भोसले यांनी सूचना दिल्या.

ॲक्टिव आणि पँसिव्ह सर्वेक्षणाअंतर्गत हिवताप विषयक रुग्णांसाठी रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले ते सर्व निरंक आढळले आहेत. एक जून २०२० पासून तीस हंगामी कंत्राटी कामगारां च्या माध्यमातून कोरोना प्रादुर्भाव कमी व्हावा आणि डासांची उत्पत्तीस्थान या ठिकाणी जंतू नाशक औषध फवारणी करण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारे पाण्याचा साठा होऊन त्या पासून डासांची उत्पत्ती होणार नाही याविषयी काळजी घेण्याचे तसेच परिसरातील सर्व हौदांमध्ये गप्पी मासे सोडून घ्यावेत , असे आवाहन नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव,आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,आरोग्य अधिकारी डॉ संग्रामसिंह गायकवाड,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ एकनाथ बोधले,जीव शास्त्रज्ञ के एस मंजूळ,आरोग्य विभागाचे निरीक्षक शरद वाघमारे,नागनाथ तोडकर,प्रभारी जीवशास्त्रज्ञ के एस मंजुळ यांनी केले आहे . 
 
Top