पुणे,(डॉ कुुुुुणाल दोशी) - निसर्ग चक्रीवादळात मृत्यू पावलेल्या पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वहागावच्या ६५ वर्षीय मंजाबाई अनंता नवले आणि नारायण अनंता नवले (वय ३८ वर्षे) यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत धनादेश सुपूर्द करण्यात आला.


चक्रीवादळामुळे बाधित खेड तालुक्यातील करंजविहीरे, शिवे आदी गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी करताना बाधित शेतकरी, नागरिक, गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत कोणत्याही बाधितांचे नुकसानीचे पंचनामे राहता कामा नयेत, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. 


पुणे जिल्ह्यामधील खेड तालुक्यातल्या वहागाव येथे चक्रीवादळानं पडझड झालेल्या घरांची तसंच धामणे येथील पत्रे उडून पडझड झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची पाहणी केली. नागरिकांना धीर दिला. यावेळी खा.अमोल कोल्हे ,आ.दिलीप मोहिते-पाटील व अन्य अधिकारी सोबत होते.


मावळ तालुक्यातल्या भोयरे व पवळेवाडी भागांत चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची तसेच  पवळेवाडीमधल्या पॉलीहाऊसची देखील पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर आ.सुनील शेळके व पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते. 


 
Top