खर्डी,(अमोल कुलकर्णी)-पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त तालुकाध्यक्ष ॲड.दिपक दामोदर पवार यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.यावेळी १२१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.तसेच महिला राष्ट्रवादीच्यावतीने आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका यांना सन्मानपत्र देण्यात आले.


  शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील यांनी केले.यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष राजुबापु पाटील, तालुकाध्यक्ष दिपक पवार , बाळासाहेब पाटील,विलास देठे,महिला आघाडीच्या अनिता पवार, बाळासाहेब जाधव, संतोष नाईकनवरे ,सुग्रीव कोळी,अरुण आसबे, रणजित लामकाने,दिलीप साळुंखे,कृष्णा माळी, धनंजय बागल,अमोल नागणे, प्रविण भोसले, प्रकाश देठे,मंगेश देठे,हणमंत सोनवले,महादेव लिंगडे व पदाधिकारी उपस्थित होते.


      यासाठी पंढरपूर ब्लड बँक,पंढरपूर यांनी सहकार्य केले.यावेळी युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


 
Top