पंढरपूर,(विजय काळे)-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी ॲड.दिपक दामोदर पवार तर  शहराध्यक्षपदी सुधीर शिवाजीराव भोसले यांची आज फेरनिवड करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे व कार्याध्यक्ष उमेश पाटील यांचे हस्ते देण्यात आले.याप्रसंगी जिल्हा सचिव लतिफ भाई तांबोळी, खजिनदार राजेंद्र हजारे व मा.उपसभापती मानाजी माने उपस्थित होते.


   गेल्या तीन वर्षापासून पक्षाध्यक्ष खा.शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मार्गदर्शनाने काम करीत असताना पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यात आली व युवकांची नवीन फळी पक्षामध्ये घेण्यात आली व त्यामुळेच लोकसभा व विधान सभा निवडणुकांमध्ये पंढरपूर शहर व तालुक्या मध्ये पक्षाच्या उमेदवारांना चांगल्या प्रकारे मताधिक्य मिळाले.त्याची पोहोच पावती म्हणूनच दोघानांही पुन्हा संधी मिळाली.या निवडीमुळे पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळणार आहे.

    आ.भारत भालके,प्रांतिक सदस्य राजुबापु पाटील,जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील यांनी निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
 
Top