पंढरपूर,(प्रतिनिधी)- कोरोना (कोडिव-19)ह्या साथीच्या रोगाने अक्षरशः थैमान घातले असून साथीचा रोग आटोक्यात येण्यासाठी मुंबई, पुणेसह महाराष्ट्रातील डाॅक्टर्स,सिस्टर,कंपाॅडर, लॅबोरेटरी मध्ये काम करणार लॅबोरेटरीशीयन, तपासणीस सेवक अथक परिश्रम घेवून कोरोना रूग्णांवर उपचार करत आहेत. हा रोग मोठ्या प्रमाणात पसरू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ,आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लाॅकडाऊन घोषित केलेले आहे.लाॅकडाऊन चे पालन करण्याकामी सबंध कामगार ,शेतकरी , शेतमजुर ,मध्यमवर्गीय कुटूंब,छोटे व्यापारी या सर्वांनी प्रसशानास सहकार्य व काटेकोर पालन केले आहे. आपल्या क्षेत्राशी निगडीत राहून जनतेने जनजागृती केली आहे .आपल्या घरी राहून जनतेने गेली तीन महिन्यापासून आपले कर्तव्य बजावत प्रसशानाच्या आव्हानाला प्रतिसाद दिला आहे.

 त्यांच्या कुटूंबाचा विचार करत त्यांना महाराष्ट्र सरकारने प्रत्येकी ३०० युनिट पर महिना माफी द्यावी.कारण गेल्या तीन महिन्यापासून कुटुंब प्रमुख सर्व कुटूंब सदस्य यांचे पालनपोशन करायचे कसे या विवंचनत होते. उत्पान्नाचे साधन काहीच नाही.म्हणून ३०० युनिटपर्यत प्रति महिना माफी देण्यात यावी,अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा अनुराधा बाळासाहेब देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उर्जामंत्री नितीन राऊत व जिल्हाचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे लाईट बिल प्रति महिना अशी मागणी केली आहे असे अनुराधा देशमुख यांनी पत्रकामध्ये म्हटले आहे.
 
Top