पंढरपूर ,(प्रतिनिधी) - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे छोटे व्यापारी, हातावर पोट असणार्‍या नागरीकांसाठी बँकेच्यावतीने सुरु केलेल्या कोविड -19 कर्ज योजनेच्या कर्जाचे वितरण बँकेचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे हस्ते करण्यात आले.

    यावेळी  संचालक बी.बी.सावंत,सतिश लाड, विवेक कवडे, सुभाष पिसे सर, व्यवस्थापक कैलास शिर्के यांच्यासह सभासद, खातेदार उपस्थित होते.

  यामुळे देशभरात लॉक शडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच पंढरपूरकरांच्या आर्थिक दृष्ट्या महत्वाची आषाढी यात्राही रद्द झाल्यामुळे छोटे व्यापारी, हातावर पोट असणार्‍या नागरीकांसाठी व्यापार्‍यांना मदतीचा हात देत निशिगंधा बँकेच्या वतीने कोविड-19 ही कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. निशिगंधा सहकारी बँकेने कायम सभासदांचे हित जोपासले असल्याचे बँकेचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सांगितले.

  निशिगंधा सहकारी बँकेचे चेअरमन कल्याणराव काळे, व्हा.चेअरमन आर.बी.जाधव व संचालक मंडळ यांनी छोट्या व्यापार्‍यांना नव्याने उद्योगधंदे उभे करण्यासाठी कमीत कमी कागदपत्रात निशिगंधा बँकेच्यावतीने कोविड-19 ही कर्ज योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत छोट्या व्यापार्‍यांना २५ ते ५० हजार रूपयां पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले होते. त्याप्रमाणे लाभधारकांना कर्ज वितरण करण्यात आले.

    व्यापार्‍यांना कर्ज मिळवून देवून मदतीचा हात दिल्याने गणेश किसन गोडबोले,मीना गोविंद पाटोळे,सतीश रंगनाथ माने,सचिन मच्छिंद्र साळुंखे, विवेकानंद चंद्रकांत गोसावी, वनिता विजय पुरी, शाम मोहन मोरे, बाबुराव लक्ष्मण गाडेकर, ज्ञानेश्वर किसन गोडबोले या छोटया व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
 
Top