पंढरपूर - सद्या कोरोना या विषाणूचा संसर्ग प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरता प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे.कोरोना विषाणूचा प्रसार माध्यम पाहता सदर विषाणूची बाधा एका संक्रमित रुग्णा कडून आणि व्यक्ती समूह यांच्या संपर्कात आल्याने वाढत आहे.

पंढरपूर शहरातील ज्ञानेश्वरनगर झोपडपट्टी भागातील रहिवासी पत्ता असलेले दोन कोरोना बाधित रुग्ण संस्थात्मक विलगीकरण केंद्र एम आय टी कॉलेज वाखरी येथे आढळलेले आहेत. त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पंढरपूर शहरातील पुढील प्रमाणे सिमा बंद करणे आवश्‍यक आहे त्यामुळे या साथीचा रोग नियंत्रण करण्यासाठी व जागतिक आरोग्य संघटना यांच्या कडील दिशा निर्देशानुसार पंढरपूर शहर हद्दीतील अर्बन बँक ,इंदिरा गांधी चौक ,सावरकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अर्बन बँक हे सीमा क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. या क्षेत्रांमधील हॉस्पिटल, मेडिकल दुकाने व दूध विक्री केंद्र वगळता इतर सर्व सेवा पुढील आदेश होईपर्यंत बंद राहतील. या सूचना भारत सरकारच्या प्रतिबंधित व बफर क्षेत्राकरीता असलेल्या सूचनांप्रमाणे तात्काळ कार्यवाही करावी असे उपविभागीय दंडाधिकारी सचिन ढोले पंढरपूर विभाग, पंढरपूर यांनी आदेश काढलेले आहेत.
 
Top