पंढरपूर - सध्या संपुर्ण जगात व भारतात तसेच सोलापूरमध्ये कोरोना विषाणुचा थैमान सुरु आहे. ते रोखण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेने शहरातील सर्व प्रभागात नगरसेवकांच्या सहकार्याने व त्यांच्या स्वयंसेवकाच्या माध्यमातून नागरिक सहायता दक्षता समिती स्थापन केली असुन प्रभाग क्र १२ , १३ ,१४ ,१५ ,१६ मधील नगरसेवक व स्वयंसेवक यांची बैठक आमदार प्रशांत परिचारक यांचे अध्यक्षतेखाली माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, नगरसेवक विवेक परदेशी, विशाल मलपे, इरफान मुजावर, धर्मराज घोडके, नवनाथ रानगट, सुरेश नेहतराव, सचिन शिंदे, नारायण शिंगण यांचे उपस्थितीत लक्ष्मी पॅलेस येथे संपन्न झाली.


  यावेळी बोलताना आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रभागातील नागरिकांना घरपोच किराणा दुध, मेडिकल , इतर आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व शासनाने पंढरपूर शहरापासुन बाहेरगावी राहणा-या नागरीकांना पंढरपूर शहरात येण्यासाठी शासन परवानगी देत आहेत. अशा बाहेर गावावरुन येणा-या नागरिकांवर नजर ठेवण्यात यावी. जेणेकरून बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तीमुळे शहरातील किंवा आपल्या प्रभागातील नागरीकांना लागण होऊ नये यांची दक्षता घेणे गरजेचे आहे. 

  यावेळी मुख्यधिकारी अनिकेत मानोरकर यांनी पंढरपूर शहरात नव्याने येणा-या नागरिकांना शहराच्या हद्दीवरच थांबवून त्यांची कोणत्या गावा वरुन आले आहेत याची नोंद घेवून पोलीस प्रशासनामार्फत त्या व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे नेले जाणार आहे. त्या व्यक्तीची उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी करुन त्या व्यक्तीला कोरोना विषाणुची कोणतेही लक्षण आहे किंवा नाही त्याची तपासणी करुनच त्या व्यक्तीला होमक्वारंटाईन किंवा इन्स्टीट्युशनल क्वारंटाईन करायचा निर्णय घेवून उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या नगरपरिषदेच्या पथकाला माहिती दिली जाईल व त्या व्यक्तीला क्वारंटाईन केले जाईल.या क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीची १४ दिवसाच्या २ टप्प्यात म्हणजेच २८ दिवस या व्यक्तीवर नजर ठेवून त्याची दररोजच्या दररोज तपासणी केली जाणार आहे. यासाठी निमाचे ३४ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच या १७ प्रभागामध्ये २ पोलीस कर्मचारी कार्यरत राहणार असुन होमक्वारंटाईन केलेली व्यक्ती कोणत्याही परिस्थीतीत घराच्या बाहेर येणार नाही याची दक्षता घेणार आहेत. प्रत्येक प्रभागासाठी नगरपरिषदेचे विभाग प्रमुख यांना झोनल ऑफीसर म्हणुन नियुक्ती देण्यात आलेली आहे. तरी त्या प्रभागातील नगरसेवक, स्वयंसेवक, पर्यवेक्षक यांनी समन्वयाने त्या भागात काम करावे व कोरोना विषाणुची प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत करावी असे आवाहन केले.  
यावेळी त्या प्रभागातील स्वयंसेवक व नगरसेवक उपस्थित होते.
 
Top