खर्डी,(अमोल कुलकर्णी)- कोरोना या भयानक महामारीने जगभर थैमान घातले असून या महामारीवर मास्क वापराणे,सतत साबणाने हात धुणे आणि सोशल डिस्टन्स या गोष्टीचे पालन सर्वानी करावे असे तज्ञांनी व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

   कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भंडीशेगाव ता.पंढरपूर येथे सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून व माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मास्क तयार करण्याचे काम सुरू केले असून हे मास्क ना नफा ,ना तोटा या तत्त्वावर जिल्हाभर विक्री केले जात आहे.या कामासाठी गावातील उत्कर्ष  महिला बचत गटाची मदत घेतली असून या गटाच्या हसीना शेख,कांता येलमार,अनिता सोनवणे या महिला मास्क तयार करून विक्रीचे काम पाहत आहेत.हे कापडी मास्क आतापर्यंत माळशिरस,पंढरपूर,सोलापूर येथील हॉस्पिटल,मेडिकल व सामाजिक संस्थांसाठी अल्प दरात विक्री केले जात आहेत.जर कोणाला हवे असतील त्यांनी हसीना शेख 9130809137 व डॉ.श्रीधर येलमार 7796117799 या क्रमांकावर फोन करून ऑर्डर करावी असे आवाहन सोलापूर सोशल फाउंडेशनचे अजित कंडरे यांनी केले आहे 

भंडीशेगाव येथे कोरोना रोगावर सातत्याने प्रबोधन करण्याचे तसेच मदत करण्याचे कामदेखील गावा तील महिला बचत गटाच्या माध्यमातून विठाई साधन केंद्राच्या मॅनेजर वंदना बिडकर , बचत गटाच्या संयोगिनी भाग्यश्री क्षीरसागर ,शकीला शेख,साधना गिड्डे ,छाया गिड्डे ,वर्षा येलमार ,उमा चौगुले या करीत आहेत .या कामी माजी पोलीस उपअधीक्षक आबासाहेब दैठणकर,सुहास गुराडे, इसाक शेख यांचे सहकार्य लाभत आहे .
 
Top