पंढरपूर नगरपरिषदचेवतीने शहरातील प्रभाग क्र पाचमध्ये नागरिकांचा पल्स ऑक्सीमिटरद्वारे   तपासणी करण्याचा शुभारंभ आमदार प्रशांत परिचारक यांचे हस्ते नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांचे अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर प्रभाग क्र ५ चे नगरसेवक उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव ,नगरसेवक सुप्रिया डांगे,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर ,मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.के. धोत्रे,डॉ राजश्री सालविठ्ठल,डॉ वृषाली पाटील, नाना कवठेकर,डॉ मिलिंद जोशी यांचे प्रमुख उपस्थित करण्यात आला.


    यावेळी बोलताना आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले की,पंढरपूर शहरातील  सर्व नागरिकांचा पुन्हा एकदा आशा वर्कर व एएनमचे मार्फत सर्व्हे करण्यात येणार असून या सर्व्हेमध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांचा पल्स रेट,शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ,सारी व कोरोनाचे लक्षणांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितपणे याचा फायदा होणार आहे .


  नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांनी बोलताना सांगितले की,शहरात आशा वर्कर व एएनमच्या आठ टीम केल्या असून त्यांचा मार्फ़त एक लाख लोकांची तपासणी करण्यात येणार आहे .अशा प्रकारे नागरिकांची पल्सऑक्सीमिटरद्वारे तपासणी करणारी पंढरपूर नगरपालिका ही भारतातील पहिली नगरपालिका आहे. 

 यावेळी विशाल जपे, नरेंद्र डांगे,माजी नगराध्यक्ष लक्ष्मीनारायण भट्टड श्रीनिवास देहूकर महाराज, मुरलीधर भट्टड ,मल्लीकार्जुन अभंगराव ,परेश पारसवार, संजय झवेरी,सोमनाथ अभंगराव ,श्याम अन्नदाते, प्रसाद शास्त्री,वैभव अभंगराव,श्री खिस्ते आदी उपस्थित होते.
 
Top