पंढरपूर ,दि. १६ मे - सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील १३ पोलिस कर्मचारी यांना कोरोनाची बाधा झाली होती त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर मध्ये दिनांक ०२ /०५ /२०२० रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारा अंती आज दिनांक १६/ ०५ /२०२० रोजी ३ पोलिस कर्मचारी यांचेसह १० नागरिकांचीही कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथून घरी सोडण्यात आले आहे.


  सोलापूर ग्रामीण पोलीस घटकांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे यापूर्वी दिनांक १४/०५/२०२० रोजी सोलापूर ग्रामीण घटकातील सहा पोलीस कर्मचारी हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते त्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलीस घटका कडील कोरोना बाधीत असलेल्या एकूण १३ पोलिसांपैकी उपचाराअंती कोरोना मुक्त झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या आता ०९ इतकी झाली असून उर्वरित ०४ पोलिसावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
आज दिनांक १६ /०५ / २०२० रोजी कोरोना मुक्त झालेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथून डिस्चार्ज देते वेळी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्तिश हजर राहून तिन्ही कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच डॉ. प्रदीप डेले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रसाद, विभाग प्रमुख औषध निर्माण शास्त्र डॉ. औदुंबर मस्के, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव डावकर सर्व छत्रपती शिवाजी महाराज स. रुग्णालय सोलापूर यांचे आभार व्यक्त केले.

    याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे पोलीस उपाध्यक्ष अरुण सावंत, पोलीस निरीक्षक सचिन दंताळ, सा .पोलीस निरीक्षक  विक्रांत बोधे व इतर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी  कोरोना मुक्त झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे .
 
Top