पंढरपूर: “साहित्य हे मानवजातीस कोणत्याही संकटास मात करण्याची आणि पुढे जाण्याची प्रेरणा देत असते. मानवी जीवनात साहित्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. भूतकाळाची आणि वर्तमानाची जाणीव साहित्यातूनच विकसित होत असते. आपल्यातील आत्मिक शक्तीची जाणीव सुद्धा साहित्यातूनच होत असते आणि त्याद्वारे आपण कोणतेही दिव्य पार पाडू शकतो” असे मत पुणे- पिंपरी-चिंचवड येथील प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स & कॉम्पुटर स्टडीजच्या इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.रूपा शाह यांनी व्यक्त केले.

 येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात इंग्रजी विभागाने Role of Literature in Current Scenario या विषयावर दि १५ मे २०२० रोजी वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.कोविड- १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर Work from Home च्या यु.जी.सी. निर्देशानुसार हे वेबिनार संपन्न झाले. यावेळी त्या तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.यावेळी वेबीनारच्या अध्यक्ष पदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे हे होते. 

अध्यक्षपदावरुन बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक भोईटे म्हणाले की, “साहित्य हे माणसाला व्यापक बनविते. माणसाला जगायला व जगाकडे पहायला विशाल दृष्टीकोन बहाल करते. साहित्यिक हे नवनिर्माते असतात. साहित्यातून नव्या जगाचे आशादायक चित्र मांडतात. हे चित्रच माणसांना जगायला बळ देते.” 

       या वेबिनारचे प्रास्ताविक व संयोजन प्रा.डॉ. समाधान माने यांनी केले.यामध्ये विविध राज्यां तील एकूण २४७ प्राध्यापक आणि विद्यार्थी झूम आणि युटूब लाईवच्या माध्यमातून सहभागी झाले होते. सोलापूर विद्यापीठ परीक्षेत्रामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचे वेबीनार के.बी.पी.महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाने यशस्वीपणे आयोजित केले.
  
    हे वेबिनार यशस्वी करण्यासाठी महविद्यालायचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी विभागप्रमुख प्रा. बी.डी. रोंगे, डॉ. समाधान माने आणि विभागातील सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.
 
Top