सरकारी योजना कोटींनें
स्मगलिंग चालते बोटीने
मटका चालतो विश्वासानें
वाळू उपसा संगनमताने
अवैद्य धंदे हप्त्याने 
निवडणूक जिंकतात पैशाने 
सत्तेत भागी युती वा आघाडीनें 
विश्व हादरले कोरोनानें
दिवस जातो रिकामटेकड्या चर्चने 
पतंग कांटला जातो अतिरेकानें 
गुन्हेगार जिंकतो दहशतीनें 
क्लीनचीट मिळते सत्तेने 
गुन्हेगार मंत्री होतो कायदेशीर पळवाटेनें 
सर्वांना संधी संविधानानें 
बिनधास्त विश्व हप्ता संस्कृतीनें 
शेतकरी लटकतो फासाला 
तलाठी धावतोय पंचनाम्याला ..... 

आनंद कोठडीया , जेऊर
९४०४६९२२००


 
Top