पंढरपूर -आज दि १४/०५/२०२० रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे पुळूज , शंकरगाव गावचे हद्दीत चालणारे हातभट्टी निर्मिती ठिकाणी छापा टाकून त्यामध्ये २८००/- रु किमतीची ७० लिटर हातभट्टी दारू तसेच १४०००/- रु किमतीचे ७०० लिटर गुळमिश्रित रसायन व ५०० रु किमतीची ५० लिटर शिंदी तसेच हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे ३००/- रु चे साहित्य असा एकूण १७५००/- मुद्देमाल जागीच जप्त करून वाहतुकीची सोय नसलेने जागीच नाश करण्यात आला.


सदर बाबत किरण अनंता काळे, रा.शंकरगाव यांचे विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणेस प्रोव्हिशन ऍक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्याचे कामकाज चालू आहे.


सदरची कारवाई पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सागर कवडे तसेच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याकडील कर्मचारी पो.ह.श्रीमंत पवार,
पो.ह.शिवाजी पाटील,पो.ना.बापूसाहेब मोरे,
पो.ना.श्रीराम ताटे,पो.शि.गणेश बाबर,पो.शि. अभिजित ठाणेकर ,पो.ना.निलेश रोंगे,
पो.शि.सचिन तांबिले यांनी केली आहे.
 
Top