नातेपुते (श्रीकांत बाविस्कर) - नातेपुते येथील सम्यक सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय बहुउद्देशीय समाजसेवी संस्था यांचेवतीने भीमनगर येथील मुस्लिम बांधवांना रमजानच्या पवित्र महिन्याचे औचित्य साधून त्यांना किराणा सामान किट वाटप करण्यात आले.


  त्याचबरोबर संस्थेने फोंडशिरस येथील भोसले वस्तीवर असणारे बांधकाम ,वीटभट्टी मजूर काम करणारे यांची स्थिती लक्षात घेऊन तिथेही किराणा सामान किट वाटप करण्यात आले.या कार्यक्रमा साठी पत्रकार श्रीकांत बाविस्कर, बाणलिंग विद्यालयाचे सभापती हनुमंत कुंभार,उद्योगपती विठ्ठल रुपनवर,संस्थेचे सचिव समीर सोरटे,सदस्य सागर भोसले,अमित सपकाळ,आप्पा सावंत, विलास भोसले,सचिन साबळे,पप्पू भोसले,विवेक भोसले आदी उपस्थित होते.
 
Top