पंढरपूर (प्रतिनिधी):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात व महाराष्ट्रात संचारबंदी लागू झाल्यापासून पंढरपूरमध्ये पांडुरंग (तात्या) माने फाऊंडेशन हे गेले तब्बल पंचेचाळीस दिवस झाले अन्न दान चालू आहे असे फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांनी एका प्रसिध्दीपत्रका द्वारे दिली.


     कोरोनाच्या संकटात आपला जीव धोक्यात घालून जनतेची सेवा कर्तव्य समजून बजावणाऱ्या पोलीस बांधव, सफाई कर्मचार्यांना ही परिवार आहे तरी ते आपल्यासाठी भर उन्हात आपल्या रक्षणासाठी उभे आहेत, हे पाहून एक आपली जबाबदारी म्हणून सकाळी चहा व नाष्ट्याची सोय करत आहे.  
     

       या लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली असून महाद्वार घाट व उद्धव घाटावरील नागरिकांनाही चहा व नाष्टा देण्यात येत आहे.
          
       या कार्याला निलेश माने यांच्या मातोश्री सुरेखाताई माने, उमेश जाधव, बालाजी कोळी, सुमित नेहतराव, आनंद नाळके, सौरभ नेहतराव, विशाल लवंड, तेजस अभंग व मित्र परिवार  सहकार्य करत आहे.
 
Top