म्हसवड - आज दि ८ मे २०२० रोजी पंचायत समिती, माण, जि.सातारा - आरोग्य विभाग यांचे अंतर्गत कार्यरत ५ प्राथमिक आरोग्य केंद्रांत काम करणारे डॉक्टर,परिचारिका,आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका,आरोग्य सेवक व आरोग्य सहाय्यक यांना ग्रामीण क्षेत्रामधील कोरोना सर्वेक्षण व प्रतिबंधासाठी लागणाऱ्या साधन सामुग्रीचे वाटप करण्यात आले .


यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे डाऊन टाऊन , यांचे सहकार्याने व वैभव पोरे यांचे योगदानातून सदर अत्यावश्यक साहित्य प्राप्त झाले .यावेळी
पीपीई किट -२० ,३ लेअर मास्क - २००,
थर्मल स्कॅनिंग मशीन- २ ,हँडग्लोज -४०० जोड्या याप्रमाणे सुमारे ४५००० रु बाजारमूल्याचे साहित्य ५ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी तालुका आरोग्याधिकारी डॉ कोडलकर  व त्यांचे सहकारी यांचेकडे सदर मदत प्रा आ केंद्र म्हसवड येथे वैभव पोरे यांचे ज्येष्ठ बंधु श्री सिद्धेश्वर रामचंद्र पोरे यांचे हस्ते  व माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांचे उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली . मान्यवरांचे मार्फत कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना सदर साहित्याचे वाटप करण्यात आले .


   वरील नमूद प्राप्त साहित्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी निश्चित फायदेशीर ठरणार असून कोरोना साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजने कामी अत्यंत उपयुक्त व महत्वाचे आहे .वैभव पोरे यांचे विनंती व मागणीचा तात्काळ विचार करुन त्वरित मदत उपलब्ध करुन दिल्या बद्दल रोटरी क्लब ऑफ पुणे डाऊन टाऊन यांचे अध्यक्षा दिनाझ तारापोर मॅडम व यझदी बाटलीवाला यांचे आभार मानण्यात आले  . 


  याप्रसंगी डॉ.मयुरी शेळके, डॉ.भरत काकडे,इतर सर्व स्टाफ तसेच अहिंसा पतसंस्थेचे बाबू मुल्ला, नितिन वाडेकर व म्हसवडमधील नागरिक सोशल डिस्टनिंग पाळून उपस्थित होते.
 
Top