सोलापूर/ प्रतिनिधी - सोलापूर ग्रामीण येथील श्वान पथकात नेमणूकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर गंगाधर परचंडे यांचा वडकबाळ येथे नाकाबंदीवर सेवा बजावत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या बोलोरे पीकअपने धडक दिल्याने उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 हा अपघात गुरुवार रोजी संध्याकाळी ८.०० च्या सुमारास घडला.परचंडे यांना सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान दिनांक २३ मे रोजी मृत्यू झाला.

त्यांना सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली.सदर अपघातातील आरोपीचा शोध घेऊन अटक करण्यात आली आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे अधिक तपास करीत आहेत.
 
Top