आजाराची कोणतही लक्षणे आढळल्यास रुग्णालयांशी संपर्क साधावा
    पंढरपूर ,०२/०५/२०२०- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर  पंढरपूर शहरात व ग्रामिण भागात सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी व थर्मल स्क्रिनिंग मोहिम सुरु केली असून, आतापर्यत शहरातील व  ग्रामीण भागातील विविध ठिकाणी सुमारे ८५ हजार नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणतीही भिती न बाळगता अथवा गैरसमज न ठेवता आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही प्रांतधिकारी ढोले केले आहे.

      कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासना च्यावतीने शहरातील तसेच ग्रामीण भागात आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  नागरिकांनी प्रशसानास सहकार्य करावे.यासाठी बाहेर गावांहून आलेल्या प्रत्येक व्यक्तींवर लक्ष ठेवावे.त्यांची माहिती नगरपालिकेला तसेच ग्रामस्तरीय समितीला तात्काळ द्यावी.आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार संबंधितांचे तात्काळ होम क्वारंटाईन करावे. ग्रामसुरक्षा समितीने गावांतील गरजा गावांतच भागविल्या जाव्यात यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी करावी . शेत मालाच्या वाहतुकीस  येणाऱ्या वाहनांच्या चालकांना वाहनांतच थांबण्यास सांगावे. तो वाहनचालक इतर कोठेही फिरणार नाही यांची दक्षता घ्यावी अशा सुचनाही प्रांतधिकारी ढोले यांनी दिल्या आहेत.  

      ग्रामीण भागात किराणा माल,औषधे,भाजी पाला व जीवनाश्यक वस्तु घरपोच मिळतील याचे नियोजन ग्रामस्तरीय समितीने करावे.गर्दी होणारे कोणतेही धार्मिक कार्यक्रम,सण उत्सव आयोजित करु नयेत.शहरातील,ग्रामिण भागातील कृषी सेवा केंद्र,हॉस्पिटल,औषध दुकाने, शासकीय धान्य दुकाने, शासकीय निमशाकीय कार्यालय आदी गर्दी होणारी ठिकाणे स्वच्छ ठेवावीत तसेच तेथील निर्जंतुकीकरण करण्यात यावे अशा सुचनही प्रांतधिकारी ढोले यांनी दिल्याआहे

बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींवर ग्रामस्तरीय समितीचे लक्ष

       कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या नागरिक,विद्यार्थी,पर्यटक,मजूर यांना आपआपल्या गावी जाण्यासाठी तसेच जिल्हयात येण्यासाठी राज्य शासनाने कार्यप्रणाली जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने बाहेरुन नव्याने येणाऱ्या व्यक्तींवर  शहरी भागात वार्डस्तरीय समिती व ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समितीने होम क्वारंटाईन व संस्थात्मक क्वारटाईन या कालावधीत त्यांच्या हालचालीवर लक्ष द्यावे अशा सूचाना प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी केल्या आहेत.
 
Top