पंढरपूर ,(नागेश आदापुरे )- सध्या कोरोनामुळे लाँकङाऊनची परिस्थिती असल्याने लग्न समारंभ आयोजित करण्यास परवानगी देण्यात येत नाही.
  त्यामुळे सरकारी परवानगी घेऊन टेंभुर्नीकर परीवार व जवळेकर परिवार यांनी लग्न  सोहळा घरामध्ये  सोशल डिस्टस्टींगचे पालन करून पार पाडला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अरुण मंजरतकर उपाध्यक्ष संजय ढाळे, समाजाध्यक्ष दत्तात्रय इंदापुरकर, कार्याध्यक्ष अनिल ढाळे व मुकुंद भुमकर ,गणेश टाक (मामा),राजेंद्र जवळेकर (मुलीचे वडील) ,हरिभाऊ इंदापूरकर यांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडला.लग्नाचा खर्च कमी करून रवींद्र टेंभूर्नीकर या मुलाच्या वडिलांनी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज ट्रस्टला दहा हजार रुपये देणगी जाहीर केली. त्याबद्दल सर्वांचे समाजाच्यावतीने ट्रस्टचे अध्यक्ष अरुण मंजरतकर यांनी आभार मानले आणि वधू वरांना आशिर्वाद दिले.
 
Top