आणि आवाहन करण्यात येत आहे की ,पंढरपूर शहरामध्ये मुंबईवरून आलेल्या दोन व्यक्ती कोरोना बाधित सापडलेल्या आहेत या पार्श्वभूमी वर यापुढे पंढरपूर शहरामध्ये येणाऱ्या सर्व बाहेर गावच्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी १४ दिवस सक्तीने मठामध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी शक्यतो पंढरपूर शहरातील रहिवासी नसलेल्या नागरिकांनी पंढरपूर शहरा मध्ये येण्याचे टाळावे तसेच त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी त्यांना शहरात येण्यास मनाई करावी आणि पंढरपूर शहर कोरोना मुक्त ठेवण्यास व करण्यास मदत करावी.
यापुढे ज्या व्यक्ती रेड झोन मधून पंढरपूरमध्ये दाखल होतील त्या सर्वांना सक्तीने १४ दिवस मठामध्येच ठेवण्यात येणार आहे व त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.तसेच शहरातील सर्व नागरिकांनी प्रशासनास मदत करावी असे आवाहन पंढरपूर नगरपरिषदचेवतीने नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केले आहे.