पंढरपूर - पंढरपूर येथे आढळलेल्या संशयित ४९ रुग्णांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. पंढरपूरची वैद्यकीय यंत्रणा, प्रांत अधिकारी सचिन ढोले , बीडीओ रविकिरण घोडके , तहसिलदार वैशाली वाघमारे , डीवायएसपी डॉ सागर कवडे आणि पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पीआय अरुण पवार, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे,पोलीस निरीक्षक किरण अवचर तसेच पोलीस कर्मचारी,महसूल विभागाचे कर्मचारी, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, आरोग्य विभागाचे सभापती विवेक परदेशी, त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर ,नगरपालिकेचे आरोग्य  अधिकारी डॉ बजरंग धोत्रे, डॉ सालविठ्ठल मॅडम  आणि नगरपालिकेचे कर्मचारी यांनी उत्तम नियोजन करुन शहरातील परिस्थिती आटोक्यात आणली.याबद्दल प्रशासनातील सर्वांचे मनापासून अभिनंदन करत आहे असे बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्विट केले आहे.
 
Top