अकलूज -अकलूज गावातील व परिसरातील नागरिकांसाठी उद्या शुक्रवार दिनांक ८ मे २०२० पासून कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या शासकीय होम टू होम सर्व्हेअंतर्गत अकलूज ग्रामपंचायत आरोग्य विभाग,तालुका आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्या सहकार्यातुन सुरवात करण्यात आली आहे. अकलूजमधील एकूण ६ वॉर्डातील घरोघरी येऊन होणाऱ्या या सर्व्हेत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या आजारा संबधी व विचारलेल्या प्रश्नां संबंधी तंतोतंत माहिती द्यावी.

  या सर्व्हेदरम्यान आपल्यापर्यन्त येणारी शासकीय व्यक्ती ही संपूर्णपणे प्रशिक्षित असेलच सोबत अकलूज ग्रामपंचायतवतीने फेस शिल्ड ,फेस मास्क,हॅण्डग्लोज,सॅनेटायजिंगसह सुसज्ज असतील याची खबरदारी घेतली आहे.तरी आपणांस विनंती आहे की आपल्या आरोग्यदायी सुरक्षित जीवनासाठी आपल्याकडून या "कोविड वॉरिअर्स" ना सहकार्य करावे.तसेच या "lock down"(संचारबंदी) काळात अनावश्यक घराबाहेर पडू नका.अत्यावश्यक परिस्थितीत बाहेर जाणे झाल्यास फेसमास्कशिवाय घराबाहेर पडू नका असे आवाहन अकलूज ग्रामपंचायतचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील आणि सर्व  ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे. 
 
Top