आपण खालील प्रमाणे विषमुक्त खरबुज उत्पादनासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला....
- खरबुज विषमुक्त/रेश्युड्युफ्री उत्पादन घेताना जमीनीची सुपिकता अत्यंत महत्त्वाची आहे त्यादृष्टीने जमीनीत शेणखत, कोंबडी खत, गांडूळ खत व लिंबोळी पेंड यांचा सुयोग्य वापर केला आहे. तसेच खरबुज लागवडीनंतर जमीनीतील मित्र किडी व बुरशी यांची वाढ करण्यासाठी जैविक जिवामृतचा सातत्याने वापर केल्याने जमीनीत चांगली पोकळी निर्माण होऊन जमीनीचा सेंद्रिय कर्ब वाढला. त्यामुळे आपण लागवड केलेल्या खरबुज पिकाची रोग प्रतिकारक शक्ती कमालीची वाढली. त्यामुळे खरबुज पिक हेल्दी बनले. विषमुक्त पिकांची चव अतिशय चांगली व शरिराची प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरते.


  सदर खरबुज हे नोनयु सीड कंपनीचे *मधुमती* या नावाचे आहे. खाण्यास चविस्ट व गोड आहे. भारतीय मार्केटमध्ये प्रथमच येत आहे. रेश्युड्युफ्री चे शेडनेट/ पॉलिहाऊसमध्ये प्रथमच प्रयोग केला जात आहे.
     

- कृषिभूषण अंकुश (तुकाराम) पडवळे 
अध्यक्ष,महा आँरगॕनिक ॲन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन, महाराष्ट्र राज्य.
 
Top