हिंदूंच्या मंदिरांतील सोने घेण्याचे आवाहन काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. ज्या काँग्रेस पक्षाने भारताला सेक्युलर घोषित करून अल्पसंख्यांकांसाठीच्या योजना आणि हाज यात्रा,इफ्तार,मौलानांचे वेतन यांच्यावर हजारो कोटी रुपये खर्च केले,एक रुपयाही कुठल्या मंदिराला दिला नाही तसेच प्रभु श्रीराम काल्पनिक असल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले, रामसेतू नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही असे सांगून रामसेतु तोडण्याचे षड्यंत्र आखले होते त्या हिंदुविरोधी काँग्रेसला हिंदूंच्या मंदिराशी काही देणे-घेणे नसून केवळ मंदिरांतील धन आणि सोन्यावर त्यांचा डोळा आहे. मागील ७० वर्षे देशात काँग्रेसची सत्ता असतांना अनेक घोटाळ्यांत जनतेचे कोट्यावधी रुपये लूटल्याचे आकडेवारी सांगते. मंदिरांतील सोने घेण्याअगोदर काँग्रेसच्या नेत्यांनी जनतेचे लुटलेले हे धन अगोदर परत करावे. हिंदूंच्या मंदिरांतील सोने घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तीव्र स्वरूपात विरोध केला जाईल, असा इशारा हिंदु जनजागृती समितीने दिला आहे.

    आज देश भीषण परिस्थितीमध्ये असतांना आमच्या मंदिरांनी सर्वांत मोठे काम केलेले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सरकारी तिजोरीत कोट्यावधी रुपयांचे धन मंदिरांनी दिलेले आहे. तसेच मंदिरांत भाविकांनी येणे बंद केलेले असतांनाही लाखो लोकांसाठी विनामूल्य अन्नदान चालवले जात आहे. हे सर्व मंदिरांतून चालू असतांना चर्च आणि मशिदी यांना काही न बोलता, हिंदु मंदिरांतील सोन्यावर डोळा ठेवून काँग्रेसने त्याचा हिंदुविरोध स्पष्ट केला आहे. काँग्रेसला आम्ही चेतावणी देऊ इच्छितो की, जर मंदिरांचे धन किंवा सोने घेण्याचा कोणताही प्रयत्न केला गेला, तर त्याला तीव्र विरोध केला जाईल,असे प्रतिपादन रमेश शिंदे,राष्ट्रीय प्रवक्ता,हिंदु जन जागृती समिती यांनी केले आहे. 
 
Top