पंढरपूर - राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने सोलापूर जिल्ह्यातील आशा सेविकांना फेसशिल्डचे वाटप कार्यकारी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हस्ते २२/०५/२०२० रोजी पंढरपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तुंगत, रोपळे, कासेगाव, गादेगाव आणि भाळवणी या ठिकाणी करण्यात आले.


सोबत राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हा अध्यक्ष डॉ.अमरजीत गोडसे पाटील,जिल्हा उपाध्यक्ष संजय हाके पाटील,पंढरपूर शहराध्यक्ष संदीप मांडवे, प्रत्येक प्रा.आरोग्य केंद्राचे मेडीकल ॲाफिसर,आशा सेविका व आरोग्य सेविका व इतर कर्मचारी उपस्थित होते.


तुंगत येथे आशा सेविका यांच्याशी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांच्या कामाचे कौतुक ही केले.


अत्यंत अल्प मानधनात आशा सेविका सध्या स्वतःचा जीव धोक्यात घालून सीमेवरील सैनिका प्रमाणे कोरोना विरुद्धच्या युद्धात काम करत आहेत. या सर्व आशा सेविकांच्या सुरक्षेच्या काळजीपोटी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी आशा सेविकांना फेस शिल्डचे वाटप करण्याचा उपक्रम घेतलेला आहे. सोलापूर जिल्ह्याचे कार्यकारी अध्यक्ष या नात्याने जिल्ह्यातील सर्व प्रा. आरोग्य केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष आशा सेविकांशी संवाद साधून, हे फेस शिल्ड आशा सेविकांना मिळाले आहे की नाही याची खात्री उमेश पाटील करत आहेत. या सर्व आशा सेविका त्याबद्द्ल कृतज्ञता व्यक्त करत आहेत व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांना धन्यवाद देत आहेत.


आज २२/०५/ २०२० रोजी पंढरपूर तालुक्यातील तूंगत या प्रा. आ.केंद्रावर फेस शील्डचे वाटप करत असताना राज्याचे आरोग्मंयंत्री राजेश टोपे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे तेथील आशा सेविकांशी कार्यकारी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या माध्यमातून संवाद साधला व आपण खूप चांगले काम करत आहात त्याची जाणीव ठेवून तुमच्या मानधनात वाढ करणार आहोत असे सांगितले. यावेळी आशा सेविकांनी फेस शिल्ड बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांचे आभार मानले.
 
Top