पंढरपूर - सोलापूर जिल्हातील चळवळीचे नेतृत्व आणि आर पी आय (आठवले गट) चे राज्याचे संघटन सचिव दीपक चंदनशिवे यांचा वाढदिवस २० मे रोजी असतो.या वर्षी कोरोनाच्या महामारी मुळे गर्दी टाळण्यासाठी या वाढदिवसाच्या निमित्ताने फक्त सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये शालेय विद्यार्थीना घरपोच वह्या आणि अडचणीतील लोकांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूचे कीट देण्यात येणार असल्याची माहिती दीपक चंदनशिवे मित्रमंडळच्या वतीने देण्यात आली आहे.

दीपक चंदनशिवे एक चळवळीतील नेतृत्व म्हणून सर्वपरिचित आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व सोलापूर जिल्ह्यातून कार्यकर्ते सत्कार आणि शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. यावेळी कोरोना परिस्थितीमुळे सत्कार समारंभसह इतर मोठे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दीपक चंदनशिवे यांनी या कोरोनाच्या परिस्थितीत धान्य,भाजीपाला, फळे, मास्क, सॅनिटायझर आदी वस्तूंचे वाटप केले असून या वाढदिवसाच्या निमित्तानेही वरील वस्तूंचे घरपोच वाटप करणार आहे अशा स्वरूपाची माहिती मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे .
 
Top