खर्डी,(संतोष कांबळे )- जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन सुरू आहे यामध्ये सोशल डिस्टनसींगचे पालन करत सध्या सरकारने लग्न समारंभांना परवानगी दिलेली आहे .या पार्श्वभूमीवर १९/०५/२०२० रोजी पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे अतिशय साध्या पद्धतीने मोजक्याच माणसांमध्ये रोंगे व कदम कुटुंबाचा लग्न समारंभ संपन्न झाला. पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील नवरी कोमल हि सिताराम महादेव -मिनाक्षी सिताराम कदम यांंची कन्या हिचा विवाह खर्डी येथील पांडुरंग भीमराव व मिनाक्षी पांडुरंग रोंगे यांचे सुपुत्र राहुल यांच्याशी संपन्न झाला.

   यावेळी नवरदेवाच्या वडिलांनी ग्रामपंचायत कार्यालय, खर्डी यांना अकरा हजार रुपयांचा चेक देऊन शासनाला सहकार्य केलेले आहे. या लग्न समारंभाला गाव कामगार तलाठी मुजावर, सरपंच रमेश हाके, युटोपीयन शुगर्सचे चेअरमन उमेश परिचारक तसेच स्वेरी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ.बी.पी.रोंगे सर उपस्थित होते.
 
Top