पंढरपूर शहरात सध्या दि ६ मे पासून ९६० इतके लोक आले असून या पैकी ८२३ इतक्या लोकांना होम क्वारणटाईन व १३७ इतक्या लोकांना        संस्थात्मक विलगीकरण तनपुरे मठ ,सातारा संकुल,दिगंबर महाराज मठ,केबीपी कॉलेज, ग्यानबा तुकाराम मठ येथे करण्यात आले आहे.


 जे नागरिक घरी आहेत अशा नागरिकांना घरात विलगीकरणमध्ये ठेवावं,मास्क वापरावा अन्य घरातील व इतर लोकांशी संपर्क ठेवू नये तसेच दररोज या लोकांना कोणत्याही प्रकारची लक्षणे आहेत का नाहीत याची पाहणी करणेसाठी  डॉकटर नियुक्त केले आहेत,ते दररोज येतात का ? नगरपरिषदेचे झोनल ऑफिसर भेट देतात का ? याची पाहणी करण्यासाठी पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन ढोले,पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधकारी अनिकेत मानोरकर,उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, त्या त्या प्रभागाचे नगरसेवक व झोनल ऑफिसर यांचेसमवेत भेटी देण्यात येत आहेत. 


     बाहेरून आलेल्या नागरिकांपासून कोरोना विषाणूची लागंण शहरात कोणत्याही नागरिकांना होऊ नये याची दक्षता घेण्यात येत आहे. मात्र होम क्वारनटाईन केलेली व्यक्ती जर घराबाहेर हिंडत असेल अथवा इतर लोकांचे संपर्कात येत असेल तर त्वरित नगरपरिषदेकडे संपर्क साधावा असे आवाहन मुख्याधिकरी अनिकेत मानोरकर यांनी केले आहे .


 
Top