चंद्राचा मोह चांदण्याना
रातराणीच्या सुगंधाच वेड निशाचाराना 
उगवत्या सूर्याची प्रतीक्षा पक्षांना 
कोसळणाऱ्या सरीची तृष्णा चातकाला 
पावसात पिसारा फुलवून नांचण्याची घाई मोराला
मृग निघताच हिरवा शालू नेसण्याची
लगबग डोंगराला
पावसाच्या डबक्यात न्हाऊन घेते चिऊताई
हंबरडा फुटतो गोठ्यातील वासरांना 
कळीला फुलण्याचा तर 
वाऱ्यासोबत फिरायचा नाद सुगंधाला 


पावसाच्या थेंबाचा प्रथमस्पर्श होताच 
मोहित करतो सुगंध मातीचा 
सुंदर खोपा वीणायची कला 
सुगरण पक्षिणीला अन विश्वाच्या पोटाच 
चांदण पिकवायचं व्रत शेतकऱ्यांला 
हेच आहे सहजीवन
कृपा निसर्गाची जगण्याला सकळ प्राणिमात्रा
हे शब्दांत टीपायची कला मात्र कवीला!!

आनंद कोठडीया,९४०४६९२२००


 
Top