पंढरपूर, (प्रतिनिधी)- पंढरपूर :-पत्रकार संरक्षण समिती, पंढरपूरच्या पत्रकार बांधवांना स्वेरी कॉलेज गोपाळपूर यांचेवतीने जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्यांच्या कीटचे वाटप करण्यात आले. सध्या कोरोनाच्या संकटामुळं सर्वांनाच आपापल्या घरात बसुन रहावे लागत आहे; परंतु पत्रकार बांधव मात्र मिनिटा मिनिटाच्या ताज्या घडामोडी आपल्यापयरंत पोहचविण्यासाठी कार्यरत आहेत. सद्यस्थितीत मात्र अनेक पत्रकारांना आर्थिक संकटास सामोरे जावे लागत आहे.या पार्श्‍वभुमी वर स्वेरीनं पत्रकारांना दिलेला मदतीचा हात कौतुकास्पद आहे.    

पत्रकार संरक्षण समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे यांनी आपल्या संघटनेतील पत्रकार बांधवांना लॉकडाऊन काळात विविध मार्गांनी मदत मिळवून शक्य तेवढा दिलासा देण्याचं कार्य सुरु केले आहे. 

 पत्रकार संरक्षण समिती,पंढरपूरचे अध्यक्ष श्रीकांत कसबे यांनी स्वेरीचे प्रा.एम.एम.पवार सर यांचेकडे संपर्क केला त्यानुसार पवार सरांनी विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट पंढरपूर शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी परिवारातर्फे पत्रकार संरक्षण समितीच्या कार्यालयात किराणा मालाचे कीट पोहोच केले. 

    पत्रकार संरक्षण समितीच्या पंढरपूर येथील पत्रकारांना पुढील टप्प्यात आणखी सहकार्य करण्यासाठी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष भगवान वानखेडे, पंढरपूर कार्याध्यक्ष झाकीर नदाफ,अध्यक्ष श्रीकांत कसबे,उपाध्यक्ष तानाजी जाधव,खजिनदार अशोक पवार, प्रसिद्धी प्रमुख संजय हेगडे, सचिव लखन साळुंखे सदस्य  विरेंद्रसिंह उत्पात,डॉ.राजेश फडे,जैनुद्दीन मुलाणी, संतोष कांबळे, शंकर पवार, शंकर कदम, लक्ष्मण जाधव,धीरज साळुंखे,उमेश टोमके,गौतम जाधव, नंदकुमार देशपांडे, अशोक पवार,तानाजी सुतकर आणि डॉ.शिवाजी पाटोळे,डॉ.संजय रणदिवे, प्रकाश इंगोले, शरद कारटकर, सचिन दळवे, नामदेव लकडे,आनंद भोसले आदी पत्रकार बांधव प्रयत्न करत आहेत.
 
Top