नातेपुते,(श्रीकांत बाविस्कर) - सध्या जगभरात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरू असल्याने,सर्व मानव जात या विषाणूमुळे अडचणीत आली आहे.तसेच काही वन्य प्राणी वन्यजीव खाद्य मिळत नसल्यामुळे अडचणीत सापडले आहेत.


राजू पाटील मित्रपरिवाराच्या विनंतीस मान देवून लोणंदचे रमेशकाका कुलकर्णी,अनिल होळ, निलेश महाराज होळ,आशितोष कुलकर्णी, रोहीत रूपनवर(फडतरी) यांनी वानरास खाद्य पदार्थ दिले व नंतरही ते खाद्य पदार्थ पुरवणार आहेत.त्यामुळे दानशूर व्यक्तींचे राजु पाटील मित्र परिवाराच्या वतीने आभार मानण्यात आले.


वानरांना खाद्य पदार्थ खाऊ घालण्यास रमेश काका कुलकर्णी,महावीर पाटिल,अनिल होळ, निलेश महाराज होळ,आशितोष कुलकर्णी,रोहित रूपनवर आदींनी सहकार्य केले आहे.
 
Top