पंढरपूर - पंढरपूर शहरांतील गोंधळी समाज बांधवांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तू गहू, तांदूळ, साखर इत्यादींचे वाटप मोरे महाराज मठ येथे करण्यात आले.
तसेच पंढरपूर येथील आकस्मिक मृत्यू झालेल्या आकाश रोकडे यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्यावतीने आणि पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या उपस्थितीत आकाश रोकडे यांच्या पत्नी आणि आई यांची प्रत्येकी दोन लाख रुपयेची विमा पॉलिसि करून त्यांना तीन महिने पुरेल एवढे जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.
यावेळी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील,शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड, उपाध्यक्ष महेश पवार, सागर घोडके,समाधान डूबल आदी उपस्थीत होते.