पंढरपूर,(विजय काळे)२४/०५/२०२०- कोरोना व्हायरसच्या काळात लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार उद्योगधंदे ठप्प झाले आहेत त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे अतोनात हाल सुरू आहेत. त्यामुळे मेंढापूर येथील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजुबापू पाटील यांच्याकडे फोनवरून संपर्क साधून मदत मागितली .त्यावेळी राजुबापू पाटील यांनी दिलेले दहा क्विंटल अन्नधान्य व मेंढापूर ग्रामपंचायत यांनी १२ क्विंटल गहू व तांदूळ असे २२ क्विंटल अन्नधान्याचे वाटप ॲड.गणेश पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

    त्यावेळी राष्ट्रवादी ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात माळी, पंचायत समिती सदस्य धोंडीराम पाटोळे,मेंढापूरचे सरपंच दिलीप कोरके,उपसरपंच बबन पाटोळे, ग्रामसेवक हाडके भाऊसाहेब, तानाजी पाटोळे, विनय पाटोळे, भारत गवळी, नवनाथ गुरव, डॉ युवराज श्रीखंडे व अरुण पाटोळे आदी उपस्थित होते.
 
Top