नातेपुते (श्रीकांत बाविस्कर)- शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशाने
१६ मे हा दिवस किसान सन्मान दिवस म्हणजे शेतकरी सन्मान दिवस माळशिरस तालुक्यात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. एकूण २०लाख कोटी रुपयांचे पॅकेज सरकारने जाहीर केले त्यामध्ये १२ कोटी शेतकरी आणि १५ कोटी शेतमजुरांचा काहीच विचार केलेला दिसत नाही. जी काही मदत केली ती तुटपुंज्या स्वरूपाची असून केवळ तोंडाला पाने पुसली आहेत.अशा परिस्थितीमध्ये माझ्या शेतकऱ्याला संरक्षण नाही. तरीसुद्धा हा शेतकरी १३५ कोटी जनतेला खायला मिळावं म्हणून जीव धोक्यात घालून शेतीमध्ये काम करतोय .शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचे संरक्षण मास्क नाही,पीपीई कीट नाही तरीसुद्धा हा शेतकरी १३५ कोटी जनतेला दोन टाइमचे खायला मिळावं म्हणून काम करताना दिसतो आहे . त्याचा विचार करायला हवा त्यासाठी १६ मे हा सन्मान दिवस म्हणून साजरा करणार असल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जाहीर केले होते.  

   त्यामुळे १६ मे सकाळी नऊ वाजता संघटनेचे मार्गदर्शक उद्योजक टी.एस.काळे,जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांच्या मार्गदर्शनाखाली
स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव फुले यांनी दहिगाव येथे स्वाभिमानीचे गोपाळ घार्गे व अमरसिंह माने-देशमुख वेळापूर, स्वाभिमानीचे माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर विझोरी, अजित कोडग व दशरथ मोरे-पाटील तोंडलेबोंडले, दत्तात्रेय भोसले सदाशिवनगर, दतात्रय ठवरे खुडूस येथे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्याला शेतामधून घरांमधून जिथे असेल त्या ठिकाणाहून हातामध्ये शेतामधील उपयुक्त साधने घेऊन बरोबर पाच मिनिटं !...मी योद्धा शेतकरी..! कोरोना योद्धा शेतकरी....! तुम्हाला गर्वाने सांगतो मी शेतकरी आहे...! अशा प्रकारचा हा कार्यक्रम माळशिरस तालुक्यात विविध ठिकाणी राबविण्यात आला. व दिवसभर शेतकरी सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
 
Top