शेळवे,(संभाजी वाघुले)- राज्यात कोरोना कोविड - १९ च्या अनेक रूग्णांना शासकीय रुग्णालयात उपचार देणे अशक्य ठरत आहे, मुळात शासकीय रुग्णालयाची अवस्था अपुरी आहे, बिकट आहे. अश्या परिस्थितीत लोकांना खाजगी किंवा धर्मादाय रुग्णालयांत दाखल व्हावे लागत आहे. पुण्यातील अनेक धर्मादाय,कार्पोरेट हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या रुग्णांची लाखो रुपये बिल आकारून वसुलीसाठी मोठी पिळवणूक केली जात आहे.


      लॉकडाऊनच्या काळात लोकांना कोणताही रोजगार नाही,पैसे मिळविण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असताना,लोकांच्या भुकेच्या आणि अन्न धान्याच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे, अश्या परिस्थितीत लोकांना वैद्यकीय सेवा, उपचार आणि औषध मोफत देण्याची मागणी रूग्ण हक्क परिषदेने पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली असल्याची महिती परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिली.

        उमेश चव्हाण म्हणाले की, जीवनावश्यक अन्न धान्य घरोघरी पोहोचविण्यात सरकारपेक्षा स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे.मात्र वैद्यकीय सेवा आणि औषधोपचारासाठी राज्य सरकारने पुढे आले पाहिजे.
 
Top