महाभारतात एक सुंदर कथा येते ती अशी की जेव्हा पांडवाना बारा वर्षाचा वनवास होतो. पांडव आणि द्रौपदी अव्दैत वनात राहू लागतात . त्यांची विचारपूस करायला भगवान श्रीकृष्ण वनात जातात . 
    त्यांची विचारपूस करत असताना भगवान भीमाला विचारतात, तुम्हाला वनवास झाला आहे . आता तु काय करणार भीमा. 
   त्यावर भीम म्हणतो, आता आमच्याकडे वेळच वेळ आहे. मी खाणार आणि झोपणार.
   हे ऐकून भगवान कपाळावर हात मारतात आणि पुढे जातात .
    भगवान झोपडीत जातात तिथे बसलेल्या  द्रौपदीची विचारपूस करून तिला विचारतात, ताई नकुल सहदेव कुठे आहेत. द्रौपदी म्हणते ,ते पहा झाडाखाली बसले आहेत.
    भगवान त्यांच्याकडे जातात, पाहतात तर ते दोघे सारीपाट खेळत असतात . 
    भगवान त्यांना पाहून म्हणतात, हौस फिटली नाही वाटत तुमची.या खेळामुळे तर हि वेळ आली आहे तुमच्या सर्वांवर .
    ते दोघे लाजतात आणि भगवंताला प्रणाम करतात .
    भगवान पुढे युधिष्ठिरा(धर्मराजा) कडे जातात आणि म्हणतात, काय हे धर्मा, तुम्ही सर्व वेळ मिळाला म्हणून फक्त आराम  करता आहात. हे बरोबर नाही .
   

 त्यावर अर्जुन म्हणतो ,"हे कृष्णा,काय करणार आम्हाला आता वेळच वेळ आहे .
     हे या सर्वांचे विचार ऐकून भगवान विचारात पडतात आणि निर्णय घेतात. सर्वांना एकत्र करून  म्हणतात, चला आपल्याला इंद्राकडे जायचं आहे. 
      तोच अर्जुन म्हणतो कशाला ?
    भगवान म्हणतात, तुला मृदंग शिकायचा आहे. धर्माला सल्ला कसा द्यायचा हे शिकायचं आहे , भीमाला स्वयंपाक , सहदेवाला घोडे राखायला , नकुलाला रथ चालवायला आणि द्रौपदीला झाडलोट करणं शिकायचं आहे. हे ऐकताच सर्व आश्चर्यचकित होऊन भगवंताकडे पाहू लागले. 
      धर्मराजा म्हणाले,भगवान आम्ही राजे आहोत हे शिकुन काय फायदा. तुम्ही द्रौपदीचा तरी विचार करा. ती भरतवर्षाची स्मरादिनी आहे .
      भगवान म्हणतात जास्त विचार करू नका. वेळ आल्यावर कळेल. सर्वजण इंद्र महालात जाऊन विविध कामे शिकतात .
      बारा बर्षाचा वनवास संपतो,पण एक वर्षाचा अज्ञातवास (कौरवांनी बारा वर्षाचा वनवास पांडवाना दिला होताच पण त्याबरोबर असा डाव पण केला होता कि जर वनवासानंतर एक वर्षात जर तुम्ही आम्हाला दिसला तर परत तुम्हाला वनवास आणि अज्ञातवास होईल) राहिला होता .
       आता सर्वांना कळेना की आपण एक वर्ष लपायच कुठे. त्यांनी भगवंतांना विचारलं .
    भगवान म्हणतात हिच ती वेळ आहे . तुम्ही खाली वेळात जी काम इंद्राकडे जाऊन शिकलात ना, आता तुम्हाला त्याचा फायदा होईल . भगवंताने त्यांना विराट राजाचा पत्ता दिला .

     हे सर्व जण स्वतःची ओळख लपवून विराट राजाकडे सेवकाची काम करतात. यात धर्मराजा कंक नावाचा ब्राह्मण होतो आणि राजाला सल्ला देतो,भीम पल्लव नावाचा आचारी होतो,अर्जुन भृहन्नड नावाचा मृदंग वादक होतो,सहदेव घोडे राखणारा,नकुल रथ सारथी तर द्रौपदी विराट राजाच्या राणीची दासी होते . 
     याप्रमाणे खाली वेळात शिकलेल्या कामाचा त्यांना अशा प्रकारे फायदा होतो .
 तात्पर्य -  या कथेवरून हेच कळते की खाली वेळ मिळाला की झोपा काढण्यात , खेळ खेळण्यात वेळ वाया घालवायचा नसतो तर या वेळात आपल्या बुद्धीला चालना मिळेल अशी कामं करावी .
व्यायाम ,योग,घरगुती कामे,कोडी सोडवणे, विद्यार्थानी पुढच्या वर्षाचा अभ्यास करणे , मुला मुलींनी वेगवेगळे पदार्थ करायला शिकणे ,गावात असाल तर शेतीची कामे अशी खूप काम आहेत .सर्वात महत्त्वाच काम म्हणजे बुद्धीसेवया; आपल्या बुद्धीला मनाला चालना मिळण्यासाठी धार्मिक ग्रंथांचे अवलोकन , अध्यायण करणे आवश्यक आहे. कारण आपण MBA , CA , Advocate , M Com असाल पण या शिक्षणामुळे माणूस विवेकी तर होतोच पण तो विवेक वापरायला अध्यात्म शिकवते .धार्मिक ग्रंथ वाचून कोणाला पद मिळणार नाही पण मिळालेल्या पदावर अहंकाररहित कसं राहायचं याची चालना मिळेल . 
 कोणाला धन मिळणार नाही पण जवळ १० रूपये जरी असलील तरी त्यात समाधानी कसं राहायचं  याची चालना मिळेल .
 कोणाला प्रतिष्ठ मिळणार नाही पण दुसऱ्याच्या संपत्तीला पाहून मनात आग लागणार नाही .

 
Top